Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस सुरु; मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस सुरु; मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. गेल्या एक तासापासून मध्यवस्ती सुरर मुसळधार पाऊस आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. गेल्या एक तासापासून मध्यवस्ती सुरर मुसळधार पाऊस आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल असून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यात पुढील चार दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली आहे. तर आज पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज बुधवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यासह घाटमाथ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातही सावधानतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात 60 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, 26 व 27 सप्टेंबरला शहरात ‘यलो अलर्ट’ म्हणजे 20 ते 30 मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. आगामी तीन-चार दिवस महाराष्ट्रात आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com