महाराष्ट्र
सिल्लोड शहरासह तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन
सिल्लोड शहरासह तालुक्यात आज सकाळ पाच वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील भराडी, अंधारीत, के-हाळा, घाटनांद्रा, गोळेगावं, अजिंठा, शिवाना परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांच्या खंडा नंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसामुळे काही ठिकाणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.