महाराष्ट्र
मुंबई-ठाण्यासह रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 13 आणि 14 जून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत हायअलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तसेच मुंबई सह ठाण्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.