मुंबईत विक्रमी पाऊस… मागील तीन दिवसात ७५० मिली पावसाची नोंद

मुंबईत विक्रमी पाऊस… मागील तीन दिवसात ७५० मिली पावसाची नोंद

Published by :
Published on

मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय. हवामान खात्याने किनारपट्टी भागाला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, अंदाजापेक्षाही जास्त पावसाची नोंद झाल्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शुक्रवारी मुंबईत २५३ मिलीलीटर पाऊस पडला होता. त्यानंतर शनिवारी २३५ मिलीलीटर आणि रविवारी रात्री तब्बल २७० मिलीलीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मागील तीन दिवसांमध्ये मुंबईत ७५० मिलीलीटर एवढा पाऊस पडला. गेल्या १२ वर्षांत जुलैमध्ये एकाच दिवसांत एवढा पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या डोप्लर रडारमधून पावसाबाबत जे चित्र मिळाले ते भीती वाढवणारे आहे. रडारला मुंबईवर तब्बल १८ किमी म्हणजेच ६० हजार फुटांहून अधिक उंचीचे ढग दिसून आले. या ढगांची उंची माऊंट एव्हरेस्टपेक्षा दुप्पट आहे. एव्हरेस्टची उंची ही सुमारे ९ हजार किलोमीटर एवढी आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये एका तासामध्येच सुमारे १५० मिलीलीटर पाऊस झाला. ढागांचे भलेमोठे आच्छादन रायगड जिल्ह्यावर तयार झाले होते. ते पुढे मुंबईच्या दिशेने गेले. त्यामुळे मु्ंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com