Rain Update: अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई: राज्यात 7 जूनला मान्सूनची सुरुवात होत असते. मात्र, यंदा पावसाने दांडी मारलाचे दिसून आले. अनेक दिवासांच्या उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसाचा विश्रांतीनंतर अखेर पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्यानं काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून यलो अर्लट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुढील तीन ते चार दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.