Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्यात पावसानी जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 500 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरूच आहे. पंचगंगेची पाणी पातळी 42 फूट 11 इंचावर पोहोचली आहे. धोका पातळी 43 फूट आहे. 81 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. 10 राज्य मार्गांसह 68 मार्गावर पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आले आहे.
राधानगरी धरण 98.20 भरलं आहे. कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात येतील. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकडच्या गावातील नागरिकांचे स्थलांतरण सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.