महाराष्ट्र
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
शशिकांत सूर्यवंशी, कराड
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोयना नदी दुथडी भरून वाहत असून तर पायथा विद्युत ग्रहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. एकूण 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात सुरू असून कोयनेच्या सहा वक्र दरवाजातून हा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
आवश्यकतेनुसार हा विसर्ग वाढवणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेला आहे.