Heavy Rain : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर काही थांबताना दिसत नाहीये. यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्यानी बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकते अशी देखील माहिती दिली आहे. बुधवारी गडचिरोलीत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy rain will continue in Maharashtra, these districts will be on alert)
याशिवाय पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारीही महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. तत्पूर्वी मंगळवारीही मुंबईसह अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी तुंबले होते. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' नोंदवला जात आहे.