Rain Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी
राज्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ताज्या अपडेटनुसार, पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून येत्या पुढील 3 तासांत अहमदनगर, बिड, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, सोलापूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यासह 40-50 किमी प्रतितास वेगाने पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने उद्या (दि. 24) मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.