महाराष्ट्र
गणेश विसर्जनाला पावसाची जोरदार हजेरी; काय आहे आजचा अंदाज? जाणून घ्या
राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ठिकठिकाणी गणपतीच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत.
मुंबई : राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ठिकठिकाणी गणपतीच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. अशातच, मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली असली तरी उत्साह कायम दिसत आहे.
हवामान विभागाने 28 सप्टेंबर म्हणजे आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.