'या' भागांत पुढील ५ दिवस मुसळधार; हवामान खात्याचा इशारा
मुंबई : महाराष्ट्राकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्ये पुनरागमन केलं आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाना नागरिक सुखावले. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दोन दिवसांपासून आभाळ कोरडे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशातच, हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे.
बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस होईल. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.