Monsoon
Monsoon team lokshahi

Monsoon Update : राज्यात उष्णतेची लाट, मान्सून आगमन पुन्हा लांबला

महाराष्ट्रातील मान्सून आगमनासाठी 12 जूनचा नवा मुहूर्त
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

पाऊस लवकर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही आटोपून घेतली. मात्र आता वेळेआधी दाखल होणारा मान्सून रेंगाळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता.

उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com