Heat Wave | होळी पेटायच्या आधी महाराष्ट्राला उन्हाचे तीव्र चटके
राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा (Heat Wave) वाढतानाच दिसतोय. होळी पेटायच्या आधीच महाराष्ट्र (Maharashtra ) उन्हाचे तीव्र चटके सहन करतोय. अनेक शहरातील पारा ४० च्या पार गेलाय. मार्च महिन्याच्या मध्यावर तापमान वाढीचा हा उच्चांक आहे. आज मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहील असे संकेत आहेत. यादरम्यान, मुंबईत (Mumbai) तापमानाचा ६५ वर्षांतील नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. १९५६ नंतर मार्च महिन्यात पहिल्यांदाच कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअल नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवसांसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत आहे. मुंबईत कमाल ३९ तर किमान २३ तापमन राहील असे अनुमान आहे. आजही उष्णतेच्या लाटा असतील. वायू सूचकांक मध्यम श्रेणीत असेल. तर पुण्यात कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान १९ डिग्री सेल्सिअस असेल. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीच १४४ नोंदवले गेले आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ४१ आणि किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअस राहील. हवामान साफ राहील. नाशिकमध्ये कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान १६ डिग्री सेल्सिअस राहील असे अनुमान आहे. तर औरंगाबादमध्ये किमान तापमान २० आणि कमाल तापमान ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वाढत्या उन्हात स्वतःची काळजी कशी घ्यावी?
– उपाशीपोटी उन्हात फिरू नका
– बाहेरून आल्यावर लगेच पाणी पिऊ नका
– शीतपेय, जंकफूड, बाहेरचे पदार्थ खाणे टाळा
– घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी, लिंबूपाणी, किंवा ताक प्या
– डोक्याला पांढरा रुमाल बांधा किंवा टोपी घाला
– बाहेरून आल्यावर लगेच एसी लावून बसू नका
– पचायला हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करा
– सुटी, सैलसर कपडे घाला
– दिवसभरात 6 ते 8 ग्लास पाणी प्या