नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य – आ.पृथ्वीराज चव्हाण

नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य – आ.पृथ्वीराज चव्हाण

Published by :
Published on

अरविंद जाधव, कराड | शहरासाठी कचरा व्यवस्थापन ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली. यावेळी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला. तसेच या सर्वांशी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. शहरासाठी कचरा व्यवस्थापन ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ २४ तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com