महाराष्ट्र
आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण; महेश बोटलेंना पुणे पोलिसांकडून अटक
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती मोठा मासा लागला गळाला.आरोग्य विभागच्या राज्याचे सहसंचालक महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोग्य विभाग पेपराच्या प्रश्नपत्रिकेत शंभर पैकी 92 प्रश्न आरोपीने लिक केले होते.
राज्याच्या आरोग्य विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार होती. आरोग्य विभागातील क्लर्क, शिपाई या पदासाठी भरती होणार होती. पेपर फुटल्यानंतर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द केली होती. प्रश्नपत्रिकेत शंभर पैकी 92 प्रश्न आरोपीने लिक् केले होते. पुणे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात लातूरच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसह एकूण अकरा जणांना अटक केली आहे. याच प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा मासा लागला गळाला.आरोग्य विभागच्या राज्याचे सहसंचालक महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.