कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कळस! स्वतःच्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दावा

कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कळस! स्वतःच्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दावा

बालस्वामी समर्थांचा बनाव केल्याप्रकरणी आई-वडिलांवर गुन्हा दाखल
Published on

कोल्हापूर : जिल्ह्यात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला आहे. स्वत:च्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दावा एका दाम्पत्याने केला असून आपल्या लहान मुलाला गादीवर बसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कसबा बावडामध्ये हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कळस! स्वतःच्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दावा
Manoj Jarange Patil : घराबाहेर पडा, मुंबईकडे चला

माहितीनुसार, इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे हे दाम्पत्य गडचिरोलीतून कसबा बावडा येथे आले होते. या दाम्पत्याने आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आलेत असे सांगत स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवले. दाम्पत्याने श्री बाल स्वामी समर्थ नावाने मुलाची ओळख बनवली होती. अगदी कमी वेळेत हजारो भक्त गण जमा झाले होते. संबंधित पालकांनी दत्त जयंतीनिमित्ताने कसबा बावडा येथे भव्य पारायण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

दरम्यान, संबंधित प्रकार समजताच शाहूपुरी पोलिसांकडून पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जादूटोणा कायद्याअंतर्गत लहान मुलांचा अशा अंधश्रद्धा पसरवणे, दहशत पसरवणे किंवा बुवाबाजी करणे यासाठी वापर करणे हा गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com