अमरावतीत ३ कोटी ५० लाखांची रक्कम जप्त, हवाला रॅकेटचा पर्दाफाश
अमरावती शहरातून हवालामार्फत मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन स्कॉर्पियो मधून सुमारे तीन कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. हवालामार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून ही सुमारे तीन कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
स्कॉर्पिओमधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे चार नागरिक हे गुजराती असून दोघे अमरावती मधील आहे, पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओ मध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही रक्कम मोजण्यासाठी दोन स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती देण्यात आली आहे,पोलीस आयुक्त आरती सिंह व डीसीपी सातव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.
दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधल्या सीटच्या खाली एक खचका का तयार करण्यात आला होता, लोखंडाच्या जाड पत्रा व नट बोल्ट याचा उपयोग करून ही यंत्रणा तयार करण्यात आली होती वरवर पाहता कुणालाही शंका येणार नाही अशी व्यवस्था या दोन्ही स्कॉर्पिओ मध्ये करण्यात आली होती.