Haribhau Rathod : हरिभाऊ राठोडांचा आरक्षणासंदर्भातील 'हा' फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला
मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं आहे. 20 जानेवारीला मुंबईसाठी निघणार आहे. मुंबईकडे कूच करण्याशिवाय पर्याय नाही. ताकदीने तयारी करा, मिळेल ती वाहनं घ्या. आंदोलन खूप मोठं आहे, आता घरी राहायचं नाही. आता हे आंदोलन शेवटचं असेल आरक्षण घेऊनच परत यायचं. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण द्यावे, नऊ टक्के भटक्या जमातींसाठी, तर नऊ टक्के बारा बलुतेदारांसाठी' असा फॉर्म्युला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोर मांडला.
जरांगे यांनी हा 'फॉम्युला' नाकारत मराठ्यांची लोकसंख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे. या 'फॉर्म्युल्या' मुळे अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण असे सांगत याला नकार दिला आहे.