Hanuman
Hanuman team lokshahi

Hanuman Temple Issue : बजरंगबलीच्या जन्मस्थळावरून 'रामायण', हनुमानाचा जन्म अंजनेरीत की किष्कींधामध्ये?

नाशिकमधील अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा काहींचा दावा
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

देशात हनुमान चालिसावरून राजकारण सुरू असताना आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून नवा वाद समोर आला आहे. हनुमानाचं जन्मस्थान नक्की कोणतं यावरून संत-महंतांमधील हा वाद नाशिकमध्ये समोर आला. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा नाशिकमध्ये आलेल्या कर्नाटकच्या किष्किंधा येथील गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे. मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंत सुधीरदास यांनी नाशिकमधील अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा केला. नाशिकमधील काही महंत जन्मस्थानाबाबत निश्चित नाहीत. त्यामुळेच आता उभा राहिलेला हा वाद सोडवण्यासाठी येत्या ३१ मे रोजी नाशिकमध्ये शास्त्रास्त्र पंचायतीचं आयोजन करण्यात आला आहे. त्यातून हा वाद मिटतो का हे पाहवं लागेल.

Hanuman
Sanjay Raut : "2024 च्या निवडणुका लढवण्यासाठी तयारीत राहा"

काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थानावरुन आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद समोर आला होता. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केला होता. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं. कर्नाटक आणि आंध्रातील हा वाद जुना असताना आता नाशिक की किष्किंदा हा वाद समोर आला आहे. कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री इथं झाला, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं होतं, की तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.

Hanuman
Navneet Rana Nagpur : राणा दांपत्याच्या रॅलीवर निर्बंध

हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांचं मत आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com