गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस, रब्बी पिकांना बसणार फटका

गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस, रब्बी पिकांना बसणार फटका

Published by :
Published on

उदय चक्रधर, गोंदिया | गोंदिया जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे हिवाळ्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांना फटका बसणार आहे. तसेच थंडीचाही जोर वाढणार आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातवरण होते. आणि संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील घोगरा आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. तर रब्बी धान पिकाचे नुकसान होणार आहे. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथिचे रोग डोकेवर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com