गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केले; अनिल परबांचा आरोप
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यात आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी गुणरत्न सदावर्तेंवर गंभीर आरोप केले आहेत.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून (St Employee) अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केला आहे. तसेच आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही परब (Anil Parab) यांनी दिली. पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचं अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
एसटी आंदोलनातील आंदोलकांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी ही तक्रार केली होती.