Maharashtra Flood : ”राणेच पांढऱ्या पायाचे”; गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्याने राज्यावर संकट आल्याची खरमरीत टीका केली होती. या टीकेचा आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून समाचार घेतला आहे. आता मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यावर आलेल्या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्याने राज्यावर संकट आल्याचे वक्तव्य केलं. मात्र, राणे हे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं. म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी जळगावात केली.
ते पुढे म्हणाले, संकटात सापडलेल्या व्यक्तीला सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करण्यासाठी एकत्र यायला हवं. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा तुमचा झेंडा घेवून तुम्ही उतरा, आमचा झेंडा घेवून आम्ही आखाड्यात उतरु. मात्र, राज्य संकटात असताना राजकारण करणे योग्य नसल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले.