नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलचे राज्यपाल आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार!

नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलचे राज्यपाल आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार!

Published by :
Published on

12 एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटलमध्ये 7 कोव्हिडं रुगणाचा एकाच वेळी मृत्यू झाला होता. हा रुगणाचा मृत्यू रुग्णालयाचा गलथान कारभार आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. नातेवाईकांच्या आरोपावरून पालिकेने एक समिती स्थापन करून रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. असे असताना शनिवारी एका खासगी कार्यक्रमात या रुग्णालयाचा करोनाकाळात सेवा देणारे सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून गौरव करण्यात आला असल्याचा एक फोटो समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णालयाचे प्रमुख डॉ. उपाध्याय यांचा गौरव करण्यात आला असल्याचे हे फोटो आहेत.

कोरोना काळात रुगणाचा जीव घेणारे, वाढीव बिल देऊन रुगणाची आर्थिक पिळवणूक करणारे रुग्णालय सर्वोत्कृष्ट सेवा देणारे कसे असू शकते असा सवाल भाजपाचे वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी करत या रुग्णालयाला दिलेला पुरस्कार तात्काळ मागे घ्यावा अशी मागणीही बारोट यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com