पुणेकरांना मोठा दिलासा; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

पुणेकरांना मोठा दिलासा; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

Published by :
Published on

पुणे: अमोल धर्माधिकारी | मुंबईपाठोपाठ पुण्यातही आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये पुणेकरांना हा मोठा दिलासा आहे सुरुवातीपासूनच पुणे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट शहर म्हणून ओळखलं जात होतं मात्र सध्या पुणे शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सप्टेंबर महिन्यापासून पुणे शहरात सरासरी दररोज 100 च्या आसपास रुग्ण आढळत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृतांच्या आकडेवारीत मोठी घट झालेली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता मात्र पुणे शहरात सुरू झालेलं लसीकरण आणि त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपवण्यात प्रशासनाला यश आलेला पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात आज शून्य मृत्यूची नोंद झालेलीच आहे तर दिवसभरात 112 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत दिलासादायक म्हणजे पुण्यात उपचार येणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजारांच्या खाली देखील आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com