‘या’ जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना मिळणार 5 लाखाचे बक्षीस
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, वर्धा प्रशासना तर्फे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. लसीकरणासाठी सरकार तसेच प्रशासनाची धडपड तर दुसरीकडे नागरिकांची लसीसाठीची प्रतीक्षा पाहता बऱ्याच ठिकाणी लसीकरणाचा टक्का वाढताना दिसून येत नाही. त्यासाठीच वर्धा जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घेत लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नाविन्यपूर्ण योजना समोर आणली आहे. लसीकरणासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत मधील संपूर्ण 100 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्राम पंचायतीला 5 लाखाचे बक्षीस देण्याचे आवाहन केले आहे.
एकाच तालुक्यातून तीन ग्राम पंचायत यासाठी निवडण्यात येणार आहे. ज्या ग्राम पंचायत 100 टक्के लसीकरण पूर्ण करतील त्या ग्राम पंचायतीला 5 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमाची चर्चा आता प्रशासनात जोर धरून आहे, या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी देखील ग्राम पंचायती पुढाकार घेतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केली आहे.