राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान;  20 हजारांहून अधिक जागांसाठी मतदान

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान; 20 हजारांहून अधिक जागांसाठी मतदान

राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे
Published on

मुंबई : राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तसेच, 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला म्हणजेच उद्याच मतमोजणी पार पडणार आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन स्थगितीमुळे बऱ्याच काळापासून रखडल्या आहेत. याला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. मुंबईसह राज्यातील 25 महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. या निवडणुका रखडल्या असल्या तरी ग्रामपंचायतींसाठी आजच मतदान होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com