पश्चिम विदर्भाला अखेर न्याय मिळाला!

पश्चिम विदर्भाला अखेर न्याय मिळाला!

Published by :
Published on

सुरज दाहाट, अमरावती
ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने 2860 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, यामध्ये विदर्भातील केवळ दोन जिल्ह्यांचा समावेश केला गेला होता तर अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र या नुकसान भरपाई यादीतून वगळण्यात आला होता. यामुळे सर्वत्र असंतोष शेतकऱ्यांमध्ये दिसून आलेला होता.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे मागणी केली, त्यामुळे गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारने नव्याने अधिसूचना जारी केली. यामध्ये राज्याच्या 9 जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यासाठी 162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी 514कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र यापैकी 162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. यात अमरावती जिल्हासाठी 5212.39 कोटी, अकोला 118.97, यवतमाळ 5664,00, बुलढाणा 4267 व वाशिम जिल्हासाठी 981 कोटी 12 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे, मात्र ही मदत दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com