महाराष्ट्र
Gold - Silver Price Today | बाजारात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ, पाहा किती झाली किंमत?
सणावाराच्या दिवसांमध्ये सोने, चांदीला अगदी झळाळी येते. अशात भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात
जागतिक पातळीवर रशियात युक्रेन आणि इजरायल हमास युद्धामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपली गुंतवणूक ही सोन्याच्या आणि चांदीमध्ये करण्यास सुरुवात केल्याने सोन्याचे आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील काळात दिवाळी सारखा मोठा सण असल्याने पुन्हा मागणीत वाढ हून सोन्याचे दर अजून वाढण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसैकानी व्यक्त केला आहे. सोन्याचे दर 80340 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याने या दरात सोने खरेदी करणे परवडत नसल्याने अनेक ग्राहकांचे बजेट बिघडल्याने त्यांनी अपेक्षा पेक्षा कमी प्रमाणात सोने करणे पसंत केले आहे.