महाराष्ट्र
ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला पुन्हा झळाळी; 605 रुपयांनी महागले!
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ, 605 रुपयांनी महागले; चांदीच्या दरातही झळाळी, जाणून घ्या नवीन दर.
ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात झळाळी आल्याच पहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 78 हजार रुपयांवर तर चांदी प्रतीकिलो 95 हजारांवर पोहाचले आहे. सोने 605 रुपयांनी वाढून 78,015 रुपयांवर, चांदी 95,800 रुपये किलोवर आली आहे.
19 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 77,410 रुपये होता, जो आता 78,015 रुपयांवर पोहचला आहे. या आठवड्यात त्याची किंमत 605 रुपयांनी वाढली आहे. चांदीचा भाव 92,283 रुपयांवर होता, जो आता 95,800 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.