वीकेंडला लोणावळ्याला जातायं ?  मग हे वाचा

वीकेंडला लोणावळ्याला जातायं ? मग हे वाचा

Published by :
Published on

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच, कोरोनाचा धोका मात्र अधिक गडद होत जात आहे. याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागला अस म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. परंतु, त्यांच्या या आवाहांकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. शनिवार आणि रविवार रोजी तर हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जाणून घ्या काय आहेत नियम
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील व खालील बाबींना प्रतिबंध असेल.

१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

२) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

४) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे,

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com