बैलगाडा घेऊन रस्त्यावर उतरणार; गिरीश महाजनांचा ठाकरे सरकारला इशारा

बैलगाडा घेऊन रस्त्यावर उतरणार; गिरीश महाजनांचा ठाकरे सरकारला इशारा

Published by :
Published on

मंगेश जोशी, जळगाव | जळगावात आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे अनेक नेते उपस्थित झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला दिला.

जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकरी आक्रोश मोर्चाला सूरूवात केली. या मोर्चात खासदार रक्षा खडसे खासदार उमेश उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे मंगेश चव्हाण संजय सावकारे यांच्यासह भाजपचे आजी माजी आमदार सहभागी झाले होते.

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने अजून पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व मदत दिलेली नाही. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. या निषेधार्थ भाजपाचा वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे मात्र अद्याप पर्यंत एकही आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केले नसून राज्य सरकारने तात्काळ वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत केला नाही व शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com