महाराष्ट्र
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी
गोपाल व्यास | कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले आहेत.
आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन, औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज रोजी झालेल्या जिल्हा टास्क फोर्स, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर यांच्या सभेत ते बोलत होते.