महाराष्ट्र
अंबरनाथमध्ये एमआयडीसीत गॅस गळती; १२ जणांना रुग्णालयात केलं दाखल
मयुरेश जाधव, अंबरनाथ | अंबरनाथमध्ये एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. सल्फयुरिक ऍसिडची गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गॅस गळतीचा त्रास झाल्यानं १२ जणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. आर के केमिकल्स कंपनीत सल्फयुरिक ऍसिडची गळती झाल्याची माहिती आहे. गॅस गळतीचा त्रास झाल्यानं १२ जणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.