महाराष्ट्र
कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील बंद घंटा गाड्यांमुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नियमितपणे कचरा उचलला जात नाही.
महापालिकेकडे एकूण 80 कचरा गाड्या असून यापैकी 25 ते 30 गाड्या बंद आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत. सहाजिकच या बंद गाड्यांचा भार पन्नास गाड्यांवर लादला जातोय. परिणामी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व ठिकाणाहून नियमितपणे कचरा संकलन कारण शक्य न झाल्यामुळे जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे.
एकीकडे महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवली असली तरी दुसरीकडे मात्र सर्वत्र कचरा दिसून येत आहे.