महाराष्ट्र
'गणपती बाप्पा मोरया'... आपेगावात टाळ, मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप
संत ज्ञानेश्वर महारांजाची जन्मभुमी असलेल्या आपेगाव येथे गणपती बाप्पाला पारंपारिक पध्दतीने टाळमृदृंगाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.
सुरेश वायभट | पैठण: संत ज्ञानेश्वर महारांजाची जन्मभुमी असलेल्या आपेगाव येथे गणपती बाप्पाला पारंपारिक पध्दतीने टाळमृदृंगाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. आईराज फ्रेंड्स ग्रुप संचलित विघ्नहर्ता गणेश मंडळाने सर्जा राजाच्या जोडीने सजलेल्या बैलगाडीतुन बाप्पाची मिरवणुक काढत गणपती बाप्पाला मोठ्या उत्सहात निरोप दिला.
सर्जा-राजाने सजावलेल्या बैलगाडीतुन गणरायाची गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये तरुणांनी टाळमृदंगाचा गजर करत गुललाची उधळण करत मनोभावी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
मोठमोठे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, ढोल ताशा पथक आदिंचा मोठा गाजावाजा न करता यावर्षी आईराज फ्रेंड्स ग्रुप संचलित विघ्नहर्ता गणेश मंडळाने ना ढोलताशांचा गजर, ना डॉल्बीचा दणदणाट फक्त टाळ-मृदुंगाच्या तालावर बाप्पाला निरोप दिला.