Ganesh Naik यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला
भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायलयाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकविल्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सत्र न्यायलयाने निकाल सुनावला.
गणेश नाईक यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरूळ येथील पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गणेश नाईक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायलयाने गणेश नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.