Ganesh Naik
Ganesh NaikTeam Lokshahi

Ganesh Naik: गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शारीरिक शोषण आणि रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गणेश नाईक (Ganesh Naik) यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचे दोन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांना कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गणेश नाईक यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

एका महिलेने गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर आरोप केले आहेत. महिलेने सांगितल्यानुसार, ते दोघे गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तसेच नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय पंधरा वर्ष आहे. नाईक यांनी त्या महिलेला ग्वाही दिली होती की, हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि त्या महिलेची फसवणूक केली. त्यानंतर नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला. मात्र, नाईक यांनी आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com