नक्षल सप्ताहातच गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; प्रेशर कुकर बॉम्ब केला नष्ट

नक्षल सप्ताहातच गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; प्रेशर कुकर बॉम्ब केला नष्ट

Published by :
Published on

व्यंकटेश दुदमवार । नक्षल सप्ताहातच गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. जागीच सापडलेल्या प्रेशर कुकर बॉम्बचा नियंत्रित स्फोट करत पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात यश आले आहे. यामुळे नक्षलवादयांना देखील मोठा हादरा बसला आहे

गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

दरम्यान २५ जुलै रोजी नक्षलविरोधी अभियान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे पुराडा हद्दीत राबविले जात होते. यातील मौजा लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधुन काढण्यात जवानांना मोठे यश आले आहे. सदर डंपमध्ये त्यांना कुकर बॉम्ब व इतर दैनंदिन नक्षल साहित्य मिळाले. यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असुन इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसला आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com