गडचिरोलीत विकासकामांना नक्षल्यांचा विरोध; रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची जाळपोळ

गडचिरोलीत विकासकामांना नक्षल्यांचा विरोध; रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची जाळपोळ

Published by :
Published on

व्येंकटेश दुडमवार | गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांनी विरोध करून रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. भामरागड तालुक्यातील इरपनार  गावाजवळील दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गडचिरोलीत विकासकामांना नक्षल्यांचा विरोध असल्याचे दिसून आले.

गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांचा विरोध स्पष्टपणे पुढे आलाय. रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. यात 9 ट्रॅक्टर 2 जेसीबीचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील इरपनार गावाजवळ दुपारी ही घटना घडली. ह्या भागातील धोडराज- इरपनार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्ता निर्मितीचे काम सुरू होते. या कामावर यंत्रसामुग्री कार्यरत असताना नक्षल्यांनी काम थांबवून वाहनांची जाळपोळ केली. अतिदुर्गम भागात विकासकामांना नक्षल्यांचा विरोध जारीच आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत नक्षल शोधमोहीम वेगवान केली आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक आणि मतमोजणी पूर्ण होऊन 24 तास होत नाही तोच नक्षली सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com