कल्याणमध्ये फर्निचर ठेकेदाराची जिममध्ये आत्महत्या; मालकाविरोधात गुन्हा

कल्याणमध्ये फर्निचर ठेकेदाराची जिममध्ये आत्महत्या; मालकाविरोधात गुन्हा

Published by :
Published on

सूरेश काटे, कल्याण-डोंबिवली | कल्याण पुर्वेत फर्निचर ठेकेदाराची जिममध्ये आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. जिम मालकाने ठेकेदारासह त्याच्या तिन्ही कामगारांना जिममध्ये तीन दिवस कोंडून ठेवत दिवाळी आधी काम पूर्ण करा नाही तर तुझ्या किडन्या विकून पैसे वसुल करेन अशी धमकी दिली होती.

जिममधील फर्निचरचे काम वेळेत काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या जिम मालकाने ठेकेदारासह त्याच्या तिनही कामगारांना जिममध्ये तीन दिवस कोंडून ठेवत दिवाळी आधी काम पूर्ण करा नाही तर तुझ्या किडन्या विकून पैसे वसुल करेन अशी धमकी दिली होती.दरम्यान याप्रकरणी कोळशे वाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत जीम मालक वैभव परब विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जीम मालक वैभव परबने चौधरी याला काँट्रॅक्ट दिले होते.मात्र दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काम पूर्ण न झाल्याने वैभव संतापला होता. त्याने 18 तारखेला त्या ठिकाणी काम करण्यास गेलेल्या पुणमारामच्या रमेश, गोगाराम आणि चोलाराम या तिन्ही कामगारांना त्याने जिम मध्ये कोंडले.19 ऑक्टोबरला पुनाराम फर्निचरचे उरलेले सामान घेऊन परतताच त्यालाही या तीन कामगाराबरोबर वैभव याने जिममध्ये कोंडून घालत बेदम मारहाण करत काम पूर्ण न केल्यास दिलेले पैसे परत कर, अन्यथा तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करेन अशी धमकी दिली होती. यामुळे घाबरलेल्या तिन्ही कामगारांनी बाहेर पळ काढला.मात्र पुनमाराम स्वत जिम मध्ये काम करत थांबला होता.

22 ऑक्टोबर रोजी पुनाराम याने जिममधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. याप्रकरणी सदर ठेकेदार पुनमाराम चौधरी याच्या नातेवाईकांनी जिम मालकाने केलेली मारहाण व काम पूर्ण करण्यासाठी दिलेली धमकी यातूनच पुनमाराम याने आत्महत्या केली. जिम मालक वैभव परब हाच पुनमाराम यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केलाय.तसेच पुनमाराम यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. दरम्यान याप्रकरणी वैभव याने केलेल्या मारहाणीमुळे आणि दिलेल्या त्रासामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणी कोळशे वाडी पोलीस ठाण्यात वैभव विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी वैभव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com