pm Narendra Modi
pm Narendra Modi

इंधन दरवाढीवरुन पंतप्रधानांना आता मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, 'महाराष्ट्राला सापत्न...'

देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेत, इंधन दरांवरुन महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सुनावलं. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मोदींच्या या विधानावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधानांना सुनावले.

महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात असल्याचे म्हणतं, उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केली. तसेच नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहे.

मोदींनी पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला. मात्र मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे हि वस्तुस्थिती नाही,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याचे २६ हजार ५०० कोटी जीएसटी थकबाकीपोटी बाकी

महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com