Friendship Day : कधी, आणि कसा सुरू झाला फ्रेंडशिप डे? जाणून घ्या इतिहास!

Friendship Day : कधी, आणि कसा सुरू झाला फ्रेंडशिप डे? जाणून घ्या इतिहास!

Published by :
Published on

प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये 'मित्र-मैत्रिणीं' हे खूप खास असतात. यांच्यासोबतचे नाते रक्तापलिकडील आणि कधीही न तुटणार असते. जे मित्र-मैत्रिणी सुख आणि दुःखामध्ये कायम तुमच्यासोबत असतात, अशांना जीवनात कधीही अंतर देऊ नये. मैत्रीचा हा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स. पण मित्र आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, ही भावना अनेकदा व्यक्त करणं कठीण जाते किंवा भावना व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळत नाही. तुम्हाला जीवनात असेच काहीसे जिवलग मित्र-मैत्रिणी नक्कीच लाभले असतील.

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी आला आहे. हा खास दिवस तुम्ही मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांसोबत खास वेळ घालवून सेलिब्रेशन कराल. यंदा कोरोनाचं सावट आहे. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून हे अंतर देखील कमी झालं आहे. मग आज Facebook, WhatsApp, Stickers, यांच्या द्वारा नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे च्या शुभेच्छा शेअर करायला मुळीच विसरू नका. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते.

'फ्रेंडशिप डे'चा इतिहास काय ?

१९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 जुलै या दिवशी अधिकृतरित्या मैत्री दिवस साजरा केला जातो. आणि भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com