किरण गोसावीवर फसवणूकीचा गुन्हा, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

किरण गोसावीवर फसवणूकीचा गुन्हा, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Published by :
Published on

नमित पाटील, पालघर | आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पालघर मधील दोन तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीवर पालघरमधील केळवे सागरी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिस दलाचे एक पथक सध्या किरण गोसावीचा शोध घेत आहे. त्यामुळे किरण गोसावीला कधीही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किरण गोसावी याने काही वर्षांपूर्वी पालघरमधील एडवण येथील उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी दोन तरुणांना के . पी . इंटरप्रायजेसच्या माध्यमातून मलेशियात नोकरी देतो या आमिषाने एक लाख 65 हजार रुपयांना गंडवल. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये केळवे पोलिसात दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. मात्र गेल्या दोन वर्षात तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात फसवणुकीचा स्वारस्य दाखवले नाही.

आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहून आर्यनसोबत सेल्फीत असलेला व्यक्ती हाच आपली फसवणूक करणारा किरण गोसावीच असल्याचं समजल्यानंतर तरुणांनी पुन्हा केळवे पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर किरण गोसावी विरोधात केळवे पोलीस ठाण्यात भादवीस कलम 420, 406, 465, 467, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पालघर पोलिसांचं एक पथक गोसावीचा शोध घेत आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com