मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. यामुळे पुण्यातील हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.
Published on

पुणे : मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. कॅम्प परिसरातील बागबान हॉटेलच्या मालकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर गुन्हा दाखल
सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ आले समोर

माहितीनुसार, पीडित फिर्यादी यांचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचे दुकान आहे. फिर्यादीच्या मटणाच्या दुकानांमधून बागवान बंधूंनी ६१ लाखांचे मटन, चाप, खिमा आणि गुर्दा अशा मटणाचे वेगवेगळे प्रकार घेतले होते. परंतु, त्याची रक्कम दिली नसल्याने फिर्यादीने अफजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान यांच्यावर लष्कर पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com