शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची डॉक्टरला मारहाण; शहरातील रुग्णालये, लसीकरण केंद्र बंद
बालाजी सुरवसे | उस्मानाबाद जिल्ह्यात डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेध म्हणून शहरातील सर्व रुग्णालये व लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याने मारहाण केल्याची माहिती असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कळंब शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर डॉ.अभिजित लोंढे यांना मारहाण झाल्याची घटना घडली. हा हल्ला माजी खासदार व त्यांचे पती रमेश नरहिरे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा डॉक्टर अभिजित लोंढे यांचा आरोप आहे. तर या प्रकरणात हल्ला करणारा बालाजी नरहिरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान संबधित मारेकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय कामकाज सुरू करणार नसल्याचा डॉक्टरांचा इशारा दिला असून घटनेचा निषेध म्हणून शहरातील सर्व रुग्णालये बंद व तासाभरापासून लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत.