Gaja Marne Case; भाजपाचे माजी खासदार संजय काकडेंना अटक

Gaja Marne Case; भाजपाचे माजी खासदार संजय काकडेंना अटक

Published by :
Published on

कुख्यात गुंड गजा मारणे मिरवणुक प्रकरणात आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे. गजा मारणे मिरवणुकीला संजय काकडे यांनी मदत केल्याने गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे.

तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनतर त्यानंतर तळोजा ते पुण्या पर्यंत येणार्‍या पोलिस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

दरम्यान गजा मारणेला मिरवणुकीसाठी अनेक मोठ्या व्यक्तींनी मदत केल्याची माहिती सामोर्त आली होती. आता तर थेट भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी गजा मारणेला मिरवणुकी करिता मदत केल्या प्रकरणी आज गुन्हे शाखेने अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com