रस्ते – पुलांच्या नुकसानीची पाहणी करा; अशोक चव्हाणांचे अधिकाऱ्यांना आदेश

रस्ते – पुलांच्या नुकसानीची पाहणी करा; अशोक चव्हाणांचे अधिकाऱ्यांना आदेश

Published by :
Published on

राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे रस्ते – पुल वाहून गेल्याच्या घटना घडल्या. या घटना रोखण्यासाठी आता रस्ते – पुलांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 290 रस्ते बंद, 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली गेल्याची प्राथमिक अंदाजानुसार माहिती आहे. यारस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार, सातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांना नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com