Chiplun Flood | आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी – देवेंद्र फडणवीस

Chiplun Flood | आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी – देवेंद्र फडणवीस

Published by :
Published on

गेल्या वर्षभरात कोकणाला तिसऱ्यांदा नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळे आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील परिस्थिती भीषण झाली आहे. अनेक नद्यांना पूरसुद्धा आला आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कणकवली व वैभववाडी तालुक्यात अतीमुसळधार पाऊस लागला असून काही घरे आणि गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बसस्थानकाला ही पाण्याचा वेढा पडला आहे.गेले तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. मात्र आज मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे.या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com