महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका कायम; वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका कायम असल्याचे पाहायला मिळत असून वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा घातला आहे. कणेगाव, भरतवाडी गावात पुराचं पाणी शिरलं आहे.
चांदोली धरणातून वारणा नदीत विसर्ग सुरू असल्याने पूर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा संपर्क तुटला आहे.
गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत जनावरांसहित स्थलांतरित व्हायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे. चांदोली धरण क्षेत्रातून सतत वारणा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.