वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल; BMCच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून कारवाई

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल; BMCच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून कारवाई

मुंबईत वायू प्रदूषणाने कहर केला आहे. शहरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईत वायू प्रदूषणाने कहर केला आहे. शहरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, तरीही काहीजणांकडून या सूचनांची पायमल्ली केली जात आहे.

मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डरविरुद्ध नोंदवलेला हा पहिला एफआयआर आहे. बीएसमसीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या बांधकाम साईटवर 25 फुट उंचीचा पत्रा लावलेला नाही.

दरम्यान, तक्रारीनुसार आरोपींनी बांधकामाच्या ठिकाणी 25 फूट उंचीचा पत्रा न टाकता पुन्हा बांधकाम सुरू केलं. ज्यामुळे लोकसेवकाच्या आदेशाचं उल्लंघन झालं आणि म्हणून बीएमसीचा तक्रारीवरून बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com